निमंत्रित समन्वय समिती : तीनशे साठ (३६०) तालुके, ३६० सदस्य

निमंत्रित समन्वय समितीमध्ये प्रत्येकी एक (०१) समन्वयक असे तीनशे साठ तालुक्यामधील एकूण ३६० समन्वयक असणार आहेत. प्रत्येक जिल्हातील सर्व तालुक्यामधील नियुक्त निमंत्रित समन्वय समितीच्या समन्वयकांनी दर दोन (०२) महिन्यात एक सभा होईल त्यात विभागीय समित्यांमार्फत दिलेल्या कामांची माहीती व संघटनात्मक कार्यक्रमा संदर्भातच चर्चा अथवा निर्णय असावेत. निमंत्रित समन्वय समिती राज्यस्तरीय विभागीय समन्वय समितीचा एक भाग म्हणून गणली / ओळखली जाईल. सहा विभागातील असणाऱ्या त्या त्या विभागातील जिल्ह्यातील सर्व तालुका (उदा. विभाग – पुणे , एकूण जिल्हे – ०५, एकूण तालुके – ५८, म्हणजेच एकूण निमंत्रित समन्वय सदस्य – ५८) निमंत्रित समन्वय समिती समन्वयकांनी एकत्र सभा चार (०४) महिन्यातून एकदा होणे बंधनकारक आहे. सभेचे स्थळ, वेळ सर्व निमंत्रित समन्वय समिती समन्वयकांनी सामुहिक चर्चा अथवा निमंत्रित समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा करून ठरवावी. सदर सभेचा काही खर्च समन्वय समितीसाठी जमा झालेल्या फी मधून मार्गदर्शक व विभागीय समन्वय समितीच्या मान्यतेने देण्यात येईल. सभेला येणाऱ्या खर्चाचा गोषवारा कमीतकमी पंधरा (१५) दिवस अगोदर देणे गरजेचे आहे. उर्वरित खर्च समितीच्या सर्व सदस्यांनी समसमान पद्धतीने करावयाचा आहे. सदर खर्चामध्ये प्रवास खर्च अपेक्षित नाही याची कृपया नोंद घ्यावी.

सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी बाबत निमंत्रित समन्वय समितीने पारदर्शक पणे तालुक्यामध्ये असलेल्या गावातील समाजबांधवा समोर सादर करणे बंधनकारक आहे. सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी समाजबांधवांच्या / समाजाच्या हिताचीच असणे अपेक्षित आहे. सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी बाबत समाजबांधवा समोर सादर करणे अगोदर त्या त्या विभागातील मार्गदर्शक व विभागीय समन्वय समितीची अनुमती घेणे गरजेचे आहे. सभेचे फोटो, उपस्थित बांधव यांची आकडेवारी, झालेले निर्णय, घायावयाचे निर्णय, ठोस कृती बाबतचा अहवाल व्हाट्सअप द्वारे विभागीय समन्वय समितीला देणे बंधनकारक आहे. ह्या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासकीय समन्वयक यांनी विस्तृत लिखित स्वरुपात दस्त करून ठेवण्याबाबत योग्य ते कार्यवाही करावी. अहवालाबाबत सर्व स्तरीय समन्वयकांनी त्यांना सहकार्य करावे.

निमंत्रित समन्वय समिती सदस्यांना वरीलप्रमाणे वार्षिक फी बंधनकारक असेल. निमंत्रित समन्वय समिती सदस्यांनी कोणत्याही स्तरावरील समन्वय समितीत कोणाही समाज बांधवांकडून विशेष मदत फंड म्हणून स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र एखादा समाज-बांधव सामाजिक संघटनात स्वेच्छेने कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता स्वतः आर्थिक मदत करत असेल तर तो निर्णय मार्गदर्शक समन्वय समितीस कळवून विभागीय समन्वयकांशी समन्वय साधून निमंत्रित समन्वय समितीला घेता येईल. निमंत्रित समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप असेल, त्यामध्ये त्या विभागातील मार्गदर्शक व विभागीय समन्वय समिती समन्वयकांना समाविष्ट करावे लागेल, इतर कोणत्याही समन्वयकांना त्यामध्ये समविष्ट करता येणार नाही. व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून फक्त समाजविषयक संघटनात्मक सुचना देणे / घेणे व सामाजिक माहिती संदर्भातच चर्चा असावी राजकीय चर्चा समन्वयकांना ग्रुप मधून करता येणार नाही.