महाराष्ट्र राज्यातील तमाम संस्था / संघटना, पदाधिकारी, प्रतिनिधी यांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी विश्वकर्मीय बांधवांच्या कल्याणासाठी संस्थेची / संघटनेची स्थापना केलेली आहे, परंतु आपण सर्व संघटीत नसल्याने आपली शासन दरबारी ताकद कमी पडत आहे म्हणूनच आपल्या सर्व संघटना/त्यांचे पदाधिकारी यांना एकत्र बोलावून आपल्या सर्वांचे विचार एकत्र करून, आपल्या सर्वांच्या एकत्रित विचाराने, सर्व समाजासाठी व त्यांचा कल्याणासाठी समन्वय साधने आवशयक आहे. संस्थाचे / संघटनांचे एकत्रीकरण अथवा विलीनीकरण तांत्रिकदृष्ट्या धर्मादाय आयुक्त नियमानुसार जरी शक्य नसले तरी आपणा सर्वांमधील समन्वय हि एक मोठी ताकद समाजासाठी निर्माण होऊ शकेल. आपण सर्वजण "महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय समिती" या व्यासपीठावर एकत्र येऊन समन्वय समिती स्थापन करू शकतो. सदर उपरोक्त समितीच्या नावामध्ये समन्वय समितीचे सदस्य बदल सुचवू शकतात याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येकाचे पद, आत्मसन्मान आदी गोष्टी अबाधित राहण्यासाठी या समितीमध्ये कोणीही अध्यक्ष अथवा नेता अथवा पदाधिकारी नसेल. विभागीय, जिल्हा, तालुका, गाव निहाय समित्या समन्वय समिती मार्फतच बनविल्या जातील तसेच समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ समाजबांधव या समितीचे प्रमुख वरिष्ठ मार्गदर्शक असतील व त्यांचीही समिती समन्वय समिती मार्फतच गठीत केली जाईल. सर्वाना मानाप्रमाणे मिळणार सन्मान... प्रत्येकजण असेल तो फक्त आणि फक्त समन्वय समितीचा सदस्य / सभासद..... सदर समितीची स्थापना कोणतीही संस्था / संघटना / पदाधिकारी करत नसून आपणा सर्व समाजबांधवांच्या विचाराने होत आहे याची कटाक्षाने नोंद घ्यावी.