संकल्पना

समन्वय....३६५ दिवस..!!

विचार समाजाचा....प्रगती समाजाची..!!



अधिक जाणून घ्या

संकल्पना

समन्वय....३६५ दिवस..!!

“पिढीला….मिळणार एक दिशा..!!”



अधिक जाणून घ्या

संकल्पना

समन्वय....३६५ दिवस..!!

“कल्पनांचा उगम होण्यासाठी..!!”



अधिक जाणून घ्या

संकल्पना

समन्वय....३६५ दिवस..!!

सामाजिक मोठी ताकद निर्माण होणार..!!



अधिक जाणून घ्या

समन्वयक
व्हा

विचारांचे एकत्रीकरण, विचारांच्या एकत्रीकरणातून समाज उपयोगी धोरण, समाज उपयोगी धोरणातून शैक्षणिक प्रगती, समाजाच्या शैक्षणिक प्रगती मधून सामाजिक प्रगती, सामाजिक प्रगती मधून समाज सबलीकरण, समाज सबलीकरणातून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी समन्वयक व्हा..!!

समाजहितासाठी निधी
उभारणे

समाजाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम बांधवांनी समाजास आर्थिक मदत करणे उचित राहील तसेच, शासन स्तरावरील आर्थिक योजना जास्तीत जास्त समाजबांधव – माता – भगिनी यांच्यापर्यंत पोहचविणे हे सर्वात मोठे आव्हान समाजहितासाठी स्व:निधी उभारूनच आपल्याला पूर्ण करता येईल.

समाजासाठी मदत
करणे

सर्व स्तरातील समाजाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच, आपल्याला समाजास शैक्षणिक, आरोग्य, अन्याय, अत्याचार बाबत मदत करावी लागेल तसेच, कारागीर, महिला व वृद्ध बांधव-माता-भगिनी यांच्या बाबत ठोस उपाय योजना कराव्या लागतील.

समन्वय....हाच विचार..!!

उद्दिष्टे

समाजातील विविध संस्था सभासद / प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विचाराचे एकत्रीकरण, विचारांच्या एकत्रीकरणातून समाज उपयोगी धोरण, समाज उपयोगी धोरणातून शैक्षणिक प्रगती, समाजाच्या शैक्षणिक प्रगती मधून सामाजिक प्रगती, सामाजिक प्रगती मधून समाज सबलीकरण, समाज सबलीकरणातून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे व सर्वात महत्वाचे.... समाज समन्वय समिती ने ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी समन्वय समिती स्थापना दिनांक 0९ डिसेंबर २०१८ रोजी सर्वानुमते पुणे येथे करण्यात आली.

  • शैक्षणिक प्रगती..!!
  • सामाजिक प्रगती..!!
  • समाज सबलीकरण..!!
  • आर्थिक स्तर उंचावणे..!!

समन्वय....एक ध्येय..!!

प्रस्तावना

!! जय विश्वकर्मा..!! जय भोजलिंग काका..!!

समाज.... चांगल्या विचाराने एका पेक्षा जास्त नागरिक एकत्र येतात त्यावेळी त्या समूहाला “समाज” म्हणतात. ज्यामध्ये सर्व व्यक्ती समाज्याच्या कल्याणासाठी ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य करतात. मानवाच्या कल्याणासाठी उत्तम आचरण, समाजाची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, उदरनिर्वाह आदी बाबत कार्य करणे अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्ती समाजाप्रती प्रेम आणि सदभावना आपल्या हृदयामध्ये ठेवत असतो. ते प्रेम व्यक्तच करावे अशी अपेक्षा नसते. समाजाच्या कल्याणासाठीच एकत्र येऊन जगातील प्रत्येक समाज आपल्या कार्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण करत असतो आणि प्रत्येक समाजाने ती करायचीच असते.

“माझा आदर्श समाज”....समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेला असावा” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बंधुतेविषयी ते म्हणतात, “आदर्श समाज गतिमान असावा. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी द्वारे खुली असणारा असावा. आदर्श समाजासाठी पूर्ण समाजाने हातभार लावावा असे अनेक हितसंबंध असावेत. इतर सामाजिक संस्थांशी संबंध ठेवण्यासाठी अनेक प्रकारची आणि सुलभ अशी व्यवस्था असावी, यालाच समाजाचे एकसुत्रीकरण असे म्हणतात. होय बंधुता आहेच व यालाच लोकशाही म्हणतात”.

समाज परस्पर विरोधक समूहाचा बनला, तर तो समाज असंघटीत राहतो, म्हणूनच आपणास आपल्या समाजातील विविध संस्थाचे / संघटनांचे विचार एकत्र करून समन्वय साधत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी “महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय समिती” स्थापन करणे आवश्यक व गरजेचे आहे..

महाराष्ट्र राज्यातील तमाम संस्था / संघटना, पदाधिकारी, प्रतिनिधी यांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी विश्वकर्मीय बांधवांच्या कल्याणासाठी संस्थेची / संघटनेची स्थापना केलेली आहे, परंतु आपण सर्व संघटीत नसल्याने आपली शासन दरबारी ताकद कमी पडत आहे म्हणूनच आपल्या सर्व संघटना/त्यांचे पदाधिकारी यांना एकत्र बोलावून आपल्या सर्वांचे विचार एकत्र करून, आपल्या सर्वांच्या एकत्रित विचाराने, सर्व समाजासाठी व त्यांचा कल्याणासाठी समन्वय साधने आवशयक आहे. संस्थाचे / संघटनांचे एकत्रीकरण अथवा विलीनीकरण तांत्रिकदृष्ट्या धर्मादाय आयुक्त नियमानुसार जरी शक्य नसले तरी आपणा सर्वांमधील समन्वय हि एक मोठी ताकद समाजासाठी निर्माण होऊ शकेल. आपण सर्वजण “महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय समिती” या व्यासपीठावर एकत्र येऊन समन्वय समिती स्थापन करू शकतो. सदर उपरोक्त समितीच्या नावामध्ये समन्वय समितीचे सदस्य बदल सुचवू शकतात याची कृपया नोंद घ्यावी.

प्रत्येकाचे पद, आत्मसन्मान आदी गोष्टी अबाधित राहण्यासाठी या समितीमध्ये कोणीही अध्यक्ष अथवा नेता अथवा पदाधिकारी नसेल. विभागीय , जिल्हा, तालुका, गाव निहाय समित्या समन्वय समिती मार्फतच बनविल्या जातील तसेच समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ समाजबांधव या समितीचे प्रमुख वरिष्ठ मार्गदर्शक असतील व त्यांचीही समिती समन्वय समिती मार्फतच गठीत केली जाईल. सर्वाना मानाप्रमाणे मिळणार सन्मान...प्रत्येकजण असेल तो फक्त आणि फक्त समन्वय समितीचा सदस्य / सभासद.....

सदर समितीची स्थापना कोणतीही संस्था / संघटना / पदाधिकारी करत नसून आपणा सर्व समाजबांधवांच्या विचाराने होत आहे याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

--> -->