विभागीय समन्वय समिती : सहा (०६) विभाग , एकूण ४२ सदस्य

विभागीय समन्वय समितीमध्ये प्रत्येकी सात (०७) समन्वयक असे सहा विभागातुन एकूण ४२ समन्वयक असणार आहेत. प्रत्येक विभागीय समितीच्या दर तीन महिन्यात एक सभा होईल त्यात समित्यांमार्फत दिलेल्या कामांची माहीती व संघटनात्मक कार्यक्रमा संदर्भातच चर्चा अथवा निर्णय असावेत. विभागीय समन्वय समिती राज्यस्तरीय विभागीय समन्वय समितीचा एक भाग म्हणून गणली / ओळखली जाईल. सहा विभागातील विभागीय समन्वय समितीची एकत्र सभा सहा महिन्यातून एकदा होणे बंधनकारक आहे. सभेचे स्थळ, वेळ सर्व विभागीय समन्वय समिती समन्वयकांनी सामुहिक चर्चा अथवा विभागीय समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा करून ठरवावी. सदर सभेचा संपूर्ण खर्च समितीच्या सर्व समन्वयकांनी समसमान पद्धतीने वैयक्तिकपणे करावयाचा आहे.

सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी बाबत मार्गदर्शक व विभागीय समन्वय समितीने पारदर्शक पणे समाजबांधवा समोर सादर करणे बंधनकारक आहे. सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी समाजबांधवांच्या / समाजाच्या हिताचीच असणे अपेक्षित आहे. ह्या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासकीय समन्वयक यांनी विस्तृत लिखित स्वरुपात दस्त करून ठेवण्याबाबत योग्य ते कार्यवाही करावी. अहवालाबाबत सर्व स्तरीय समन्वयकांनी त्यांना सहकार्य करावे.

विभागीय समन्वय समितीमधील समन्वयकांना उपसमितीमध्ये सहभागी होता येईल, तसेच उपसमिती मधील कार्याची व निर्णयांची माहिती घेऊन ती समाज बांधवांना प्रसारित करता येईल.

विभागीय समन्वय समिती समन्वयकांना वरीलप्रमाणे वार्षिक फी बंधनकारक असेल. विभागीय समन्वय समिती समन्वयकांनी कोणत्याही स्तरावरील समन्वय समितीत कोणाही समाज बांधवांकडून विशेष मदत फंड म्हणून स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र एखादा समाज-बांधव सामाजिक संघटनात स्वेच्छेने कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता स्वतः आर्थिक मदत करत असेल तर तो निर्णय मार्गदर्शक समन्वय समितीस कळवून विभागीय समन्वयकांना समन्वय साधून घेता येईल. विभागीय समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप असेल, त्यामध्ये त्या विभागातील मार्गदर्शक समन्वय समिती समन्वयकांना समाविष्ट करावे लागेल, इतर कोणत्याही समन्वयकांना त्यामध्ये समविष्ट करता येणार नाही. व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून फक्त समाजविषयक संघटनात्मक सुचना देणे / घेणे व सामाजिक माहिती संदर्भातच चर्चा असावी राजकीय चर्चा समन्वयकांना ग्रुप मधून करता येणार नाही.

विभागीय समन्वय समितीत असणाऱ्या समन्वयकांनी आपापल्या विभागातील जिल्हामधील नोंदणीकृत संस्थेचा अथवा समाजिक प्रभावी व कार्यक्षम समाजबांधव कार्यकर्त्यांची निवड जिल्हा समन्वय समिती मध्ये करावयची असून त्यासाठी त्या जिल्ह्यातील असणाऱ्या तालुक्यामधील नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी अथवा समाजिक कार्यक्षम व प्रभावी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.