मार्गदर्शक समन्वय समिती : सहा (०६) विभाग , एकूण ३० समन्वयक

मार्गदर्शक समन्वय समितीमध्ये प्रत्येकी पाच (०५) समन्वयक असे सहा विभागातुन एकूण ३० समन्वयक असणार आहेत. प्रत्येक मार्गदर्शक विभागीय समितीची दर तीन महिन्यात एक सभा होईल त्यात इतर समित्यांना करावयाची कामे व संघटनात्मक कार्यक्रमा संदर्भातच चर्चा अथवा निर्णय असावेत. मार्गदर्शक समन्वय समिती इतर समन्वय समितींना कामकाजात मार्गदर्शन करेन, तसेच ह्या समितीस राज्यस्तरीय विभागीय दर्जा असेल. सहा विभागातील मार्गदर्शक समन्वय समितीची विभागीय समन्वयकांसह एकत्र सभा सहा महिन्यातून एकदा होणे बंधनकारक आहे. सभेचे स्थळ, वेळ सर्व मार्गदर्शक समन्वय समिती सदस्यांनी सामुहिक चर्चा अथवा मार्गदर्शक समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा करून ठरवावी. सदर सभेचा संपूर्ण खर्च समितीच्या सर्व सदस्यांनी समसमान पद्धतीने वैयक्तिकपणे करावयाचा आहे.

सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी बाबत मार्गदर्शक व विभागीय समन्वय समितीने पारदर्शक पणे समाजबांधवा समोर सादर करणे बंधनकारक आहे. सभेमधील गोषवारा / निर्णय / चर्चा / धोरणे आदी समाजबांधवांच्या / समाजाच्या हिताचीच असणे अपेक्षित आहे. ह्या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासकीय समन्वयक यांनी विस्तृत लिखित स्वरुपात दस्त करून ठेवण्याबाबत योग्य ते कार्यवाही करावी. अहवालाबाबत सर्व स्तरीय समन्वयकांनी त्यांना सहकार्य करावे.

मार्गदर्शक समन्वय समितीमधील सदस्यांना उपसमितीमध्ये सहभागी होता येणार नाही, मात्र उपसमिती मधील कार्याची व निर्णयांची माहिती घेऊन ती समाज बांधवांना प्रसारित करता येईल.

मार्गदर्शक समन्वय समिती सदस्यांना पाचशे (५००) रुपये वार्षिक फी बंधनकारक असेल. मार्गदर्शक समन्वय समिती सदस्यांनी कोणत्याही स्तरावरील समन्वय समितीत कोणाही समाज बांधवांकडून विशेष मदत फंड म्हणून देण्यासाठी आग्रह करू नये व याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र एखादा समाज-बांधव सामाजिक संघटनात स्वेच्छेने कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता स्वतः आर्थिक मदत करत असेल तर तो निर्णय मार्गदर्शक समन्वय समितीस विभागीय समन्वयक यांच्याशी समन्वय साधून घेता येईल. मार्गदर्शक व विभागीय समन्वय समितीचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप असेल, त्यामध्ये त्या विभागातील मार्गदर्शक समन्वय समिती समन्वयकांना समाविष्ट करावे लागेल, इतर कोणत्याही सदस्यांना त्यामध्ये समविष्ट करता येणार नाही. व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून फक्त समाजविषयक संघटनात्मक सुचना देणे / घेणे व सामाजिक माहिती संदर्भातच चर्चा असावी राजकीय चर्चा समन्वयकांना ग्रुप मधून करता येणार नाही.

मार्गदर्शक समन्वय समितीत असणाऱ्या समन्वयकांनी आपापल्या विभागातील जिल्हामधील नोंदणीकृत संस्थेचा अथवा समाजिक प्रभावी व कार्यक्षम समाजबांधव कार्यकर्त्यांची निवड जिल्हा / तालुका समन्वय समिती मध्ये करावयची असून त्यासाठी त्या जिल्ह्यातील / तालुक्यातील असणाऱ्या जिल्ह्यामधील / तालुक्यामधील नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी अथवा समाजिक कार्यक्षम व प्रभावी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.