कोल्हापुर, सांगली व सातारा मदत

कोल्हापुर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे हजारो समाज बांधवांना स्थलांतरांची वेळ आली आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे समाज बांधवाचे अतोनात नुकसान झाले आहे. समाजातील अनेक बांधवांना या महापुराचा सामना अजूनही करावा लागत आहे. अशाप्रसंगी आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांना मदत करणे आवश्यक होते. त्यास अनुसरून दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०१९ रोजी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ५७७ बांधवांपर्यंत पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचविण्यात यशस्वी झालो आहोत. पहिल्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची मदत अजून काही समाज बांधवांना करावयाची असल्यास सदर बांधव दुसऱ्या टप्प्यात करू शकतात.