कोल्हापुर चिंतन मेळावा

सन्मानीय समाज बांधवानो सामाजिक सृजनातून चिंतनशील समाज घडविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य व सहभागातून “महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती” महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात चिंतन मेळाव्यांचे आयोजन करीत आहे. प्रबोधन, प्रशिक्षण तसेच समाजहितावह अनेक विषयावर वैचारिक चिंतन करीत समन्वयाच्या बहुआयामी प्रागतिक नवसंकल्पाच्या सामाजिक एकात्मतेच्या दिशेने ही वाटचाल आपण करत आहोत.